संजय राऊतांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे मी ढुंकूनही बघत नाही – नितीशकुमार

sanjay raut

पाटणा- उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन धोरण आखले आहे. या धोरणाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा विरोध आहे. यामुळे नितीशकुमार यांनी केंद्र सरकारमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असं खा. संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर आता नितीशकुमार यांनी प्रतिक्रिया दिली असून राऊत यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

नितीशकुमार यांचा जनता दरबार संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना रोखलं आणि संजय राऊत यांच्या आवाहनावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना नितीशकुमार यांनी संजय राऊतांचं आवाहन धुडकावून लावत चांगलंच झापलं.अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मुंबईत मृत्यू झाला. त्यावेळी संजय राऊत यांनी काय वक्तव्य केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. यामुळे संजय राऊतांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे मी ढुंकूनही बघत नाही, असा टोला नितीशकुमारांनी लगावला.

शिवसेनेची आधी महाराष्ट्रात भाजपसोबत युती होती. पण ही युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली आहे. संजय राऊत आणि त्यांचा पक्ष आधी कुणासोबत होता आणि आता कुणासोबत आहे, हे सर्वांना दिसतंय. यामुळे अशा नेत्यांच्या म्हणण्याकडे मी लक्ष देत नाही, असं नितीशकुमार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP