fbpx

बिहारचे मुख्यमंत्रीपद तर नितीश कुमारांकडेच राहणार; जेडीयूचा भाजपला इशारा

पाटणा : नितीश कुमार भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा बिहारमधील चेहरा आहेत. नितीश बिहारमध्ये लोकप्रिय असल्यामुळेच ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि पुढच्या निवडणुकीतही नितीश हेच राज्याचे मुख्यमंत्री असतीलअसे जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस पवन वर्मा यांनी सांगितले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर ते बोलतं होते.

दरम्यान जेडीयूचं हे वक्तव्य भाजपसाठी इशारा मानण्यात येतोय. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चारवर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी भाजपा आणि अन्य घटक पक्षांची बैठक होणार आहे. त्याआधी बैठकीत काय भूमिका मांडायची यावर चर्चा करण्यासाठी जेडीयूची आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. पोट निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएमधील घटकपक्षांनी भाजपा जास्त काळ मोठया भावाची भूमिका बजावू शकणार नाही असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.