fbpx

शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नितीन उदमलेंच्या उमेदवारीची चर्चा

अहमदनगर / भागवत दाभाडे : राज्यात युतीची चर्चा रोज नवनवीन वळणे घेत असतानाच शिर्डी लोकसभा मतदार संघातून मात्र भारतीय जनता पार्टीकडून नितीन उदमलेंच्या उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली आहे. युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असूनही भाजपाने नितीन उदमले यांचा आधीच प्रवेश करून त्यांना सक्रिय केले. प्रशासनाचा सक्रिय अनुभव व चर्मकार समाजातील अधिकारी या जमेच्या बाजू असलेला संघ विचाराचा प्रभाव असणारा एक तरुण कार्यकर्ता पक्षामध्ये सक्रिय करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी कडे केंद्रात व राज्यात सत्ता असूनही मागासवर्गीय समाजातून पुरेसे नेतृत्व पक्षाकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. त्या दृष्टीकोनातून पुढची २० ते २५ वर्षे पक्ष कार्यात उपयोग होऊ शकेल अशा पद्धतीने उदमले यांना सक्रिय करण्यात येत आहे.

ग्रामविकास विभागात बी डी ओ आणि डेप्युटी सी इ ओ म्हणून काम केलेले असल्याने त्यांना ग्रामीण भागाची चांगली जाण आहे. गाव पातळीवरील समाजकारण आणि राजकारण यांची चांगली समज असल्याने ते पटकन लोकांमध्ये मिसळून जातात. त्याचबरोबर स्वतः बी एस्सी ऍग्री असल्यामुळे व शेती क्षेत्राची आवड असल्याने शेतकरी वर्गाशी त्यांचा थेट संवाद प्रस्थापित होतो. शेतीच्या समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन व समस्यांवर उपाय सुचविण्याची त्यांची क्षमता त्यांना भारतीय जनता पार्टी मध्ये एक वेगळे स्थान निर्माण करून देत आहे. शेतकरी नेत्यांबरोबर त्यांचे असणारे सलोख्याचे संबंध व संवाद यामुळे त्यांना पुढील काळात शेतकरी व सरकार मधील दुवा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकरी वर्गाशी सरकारची नाळ जोडू शकणारा व प्रशासनाची उत्तम जाण असणारा तरुण नेता म्हणून नितीन उदमले यांच्याकडे पहिले जात आहे.

भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करूनही ते स्थानिक पातळीवरील पक्षातील सर्व गटांशी समन्वय ठेऊन आहेत. पक्षातील जुन्या जाणकारांनाही व्यवस्थित सन्मान देऊन नवीन नेतृत्वाशी ही त्यांची व्हेवलेंथ जुळत आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांला सन्मानाची व आपुलकीची वागणूक देण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते पक्षातील शेवटच्या वर्गात प्रिय बनत आहेत. त्याचबरोबर विविध समाजघटकांशीही त्यांचे सलोख्याचे व संवादाचे संबंध असल्याने इतर वेळी सहजासहजी भाजपाला न मानणाऱ्या समाज वर्गात देखील त्यांना पोहचणे शक्य होत आहे. कोणत्याही समाज घटकाविषयी पूर्वग्रह न ठेवता त्यांचे प्रश्न समजून घेण्याच्या त्यांच्या शैलीमुळे त्या समाज घटकांकडूनही त्यांना स्विकारले जात आहे. असे असतानाही ते कोणत्याही प्रस्थापित नेत्यांच्या वळचणीला गेल्याचे चित्र नाही. आवशक्य तेवढे सन्मानजनक अंतर सर्वांशी ठेवून स्वतःची विकासात्मक प्रतिमा ते उभी करत आहेत. राजकारण विरहीत विविध सामाजिक उपक्रमातून लोकांपर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने इतर पक्षीय सुद्धा त्यांच्या विषयी सकारात्मक राहतील. कोणत्याही वादात न पडता सामान्य जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून दैनंदिन राजकारणात ढवळाढवळ न करण्याची भूमिका त्यांचे पारडे शिर्डी लोकसभेसाठी जड करीत आहे.

5 Comments

Click here to post a comment