मुंबई : राज्यात वीज बिल (Light Bill) थकित असल्यामुळे कृषी पंपाचं वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ऊर्जा विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. नुकतीच पेरणी झालेली, गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचं काम सुरु असताना वीज कनेक्शन कापलं जात असल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऊर्जा विभागाच्या विरोधात आंदोलने देखील केली जात आहेत. भाजपच्या या भूमिकेवर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
वीज फुकटात तयार होत नाही. त्यासाठी कोळसा लागतो, पैसा लागतो, कर्ज काढावं लागतं, ते आणायचं कुठून? असा सवाल नितीन राऊत यांनी केला आहे. शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल. फार तर त्यांना वीज बिल भरण्याची सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे. भाजपने शेतकऱ्यांना वीज बील न भरण्याची सवय लावून ठेवली आहे. महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आला आहे तो कुठून भरायचा? असा सवाल नितीन राऊत यांनी भाजप नेत्यांना केला आहे.
वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली? कोळसा, पाणी यापासून वीज निर्मिती होते त्याला पैसे मोजावे लागतात. वीज वापरतात मग वीज बिल भरायला का नको वाटतं? मुंबई अंधारात बुडाली तेव्हाही आम्ही तत्काळ वीज पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला, असंही नितीन राऊत यावेळी म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरुनही नितीन राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारचे दिल्लीतील नेते कशी टीका करतात हेच समजत नाही. केंद्र सरकारनं इंधनाचे दर कमी करण्याचे प्रयत्न केले नाहीत. क्रूड ऑईलचे दर कमी असताना त्यांच्याकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्राकडून केलं जात आहे, अशी टीका नितीन राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही भाजपला पुरुन उरलो, महाराष्ट्रही सरकारी दहशतवाद्यांचा…’
- संसदभवन परिसरातील आंदोलक खासदारांना जया बच्चन यांनी वाटले चॉकलेट, पापड
- कोरोना म्हणजे फर्जीवाडा; कालीचरण महाराजांनी उधळली मुक्ताफळे
- ‘चैत्यभूमीवर यंदाही प्रवेश बंदी केली, दुतोंडी खंडणी सरकारचा जाहीर निषेध’
- ‘उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?’
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<