fbpx

कामात गडबड झाल्यास बुलडोझर खाली चिरडेन; गडकरींची ठेकेदारांना धमकी

nitin-gadkari

भोपाळ- केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. बेतुलमधील एका जनसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना धमकी दिल्याचं सांगितलं. ‘काम योग्य झालं नाही किंवा कामात काही गडबड झाली तर मातीऐवजी तुम्हाला बुलडोझर खाली चिरडेन’, अशी धमकी कत्रांटदारांना दिल्याचं स्वतः नितीन गडकरी यांनी सांगितले.

नितीन गडकरी म्हणाले की, ‘ इथे जितके कंत्राटदार काम करतात त्यापैकी एकही दिल्लीहून आलेला नाही. एकाही रुपयाचा भ्रष्टाचार नाही. या रस्त्यांचे मालक तुम्ही आहात. काम योग्य झालं आहे की नाही हे पाहणं तुमचं काम आहे. जर कामात गडबड झाली तर बुलडोझर खाली मातीच्या जागी तुम्हाला चिरडून टाकीन, असं कंत्राटदारांना बजावलं आहे’. दरम्यान नितीन गडकरी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.