#व्यक्तिविशेष : नितीन गडकरी : जे बोलतो, ते करून दाखवणारा एकमेव लोकप्रिय मराठी नेता

nitin gadkari

शिवराय कुलकर्णी : संकटाचे रूपांतर संधीत केले पाहिजे, असे आपण नेहमी वाचतो, ऐकतो. पण याचे उदाहरणच द्यायचे झाले तर देशपातळीवर एक नाव समोर येते ते म्हणजे नितीनजी ! अचानक जगाला कोरोनाने ग्रासले. देश चिंतातूर होता. नितीनजी मात्र, तात्काळ कामाला लागले. पीपीई किट्स, सॅनिटायझर अत्यल्प दरात उपलब्ध होऊ शकते, हे नितीनजींनी प्रथम देशाला दाखवले. कोरोनाचे संकट मोठे असले तरी या बदलत्या परिस्थितीत देश पुढे कसा जाऊ शकतो, याचे समीकरण नितीनजी मांडतात आणि ते सर्वांना पटते. कारण जे बोलतो, ते करून दाखवणारा नेता, अशी ख्याती नितीनजींनी प्राप्त केली आहे. तरुणाईच्या विशेषणांमध्ये सांगायचे झाले तर गडकरी म्हणजे Brand, visionary, Motivator, Real leader, Great inspiration !!!

नितीनजी गडकरी हे स्वतः तर विकास या शब्दाचा खरा अर्थ बनले. आपल्या अचाट कर्तृत्वाने, अफाट धाडसाने, प्रचंड कल्पकतेच्या आधारे गडकरींनी विकासाचे नवे मापदंड उभे केले. काल पर्वा पर्यंतच्या राजकारणात लोकांनी वारंवार मागणी करायची आणि नंतर ती राजकारण्यांनी पूर्ण करायची, अशी पद्धत होती. नितीनजींनी लोकांवर मागणी करण्याची वेळच येऊ दिली नाही. स्वतःच उणिवा शोधायच्या आणि त्या पूर्ण करायच्या. भविष्याचा वेध घेत सोयी सुविधांचा अक्षरशः भडिमार करण्याची नितीनजींना सवय जडली. केवळ नागपुरातच नव्हे तर त्यांनी देशभर हा झंजावात उभा केला. लेह लडाख पासून ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतभर नितीनजींचा परिचय त्यांच्या विकासकार्यामुळे झाला. देशात कोणताही आटोरीक्षावाला सांगतो, हे काम गडकरी साहेबांच्या कृपेमुळे होत आहे !

परीक्षांचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरे यांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

अमेठी हे नाव संपूर्ण देशाला केवळ तो स्व. राजीव गांधी आणि नंतर राहुल गांधी यांचा मतदारसंघ म्हणून माहीत आहे. रायबरेली हा पूर्वी इंदिराजी आणि नंतर सोनिया गांधी यांचा परंपरागत मतदारसंघ. गुणा हे नाव माधवराव सिंधिया आणि नंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मतदारसंघ म्हणून तर बलिया हे नाव माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा मतदारसंघ म्हणून माहीत आहे. माजी पंतप्रधान नरसिंहराव लढले म्हणून देशाला रामटेक माहीत झाले. भारताच्या राजकारणात असे शेकडो मतदारसंघ सांगता येतील. त्या स्थानांवरून दिग्गज लढतात आणि तिथले लोक मोठा माणूस लढतोय म्हणून त्यांना निवडून पण देतात. वर्षांनुवर्षे लोकांनी नेत्यांशी बांधिलकी जोपासली पण त्याच सामान्यजनांच्या पदरी नेत्यांकडून परतफेड म्हणून काय आले ? अशा दिग्गज नेत्यांच्या शेकडो मतदारसंघाच्या नशिबी विकास आला नाही. मूलभूत सुविधा उभारण्याएवढे प्राथमिक कामही देशपातळीवरच्या नेत्यांनी केलेले नाही, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. सामान्य लोक तुमचा मोठेपणा जपतात, त्या बदल्यात त्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या नेत्यांनी काय केले, या प्रश्नाचा शोध घेतला तर विदारक वास्तव समोर येते. भारतीय राजकारणातील ही परंपरा नितीनजींसारख्या नेत्यांनी मोडीत काढली.

देशाचे नेतृत्व करताना आपल्याला ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या मतदारसंघाला तळहातावरच्या फोडासारखे जपले पाहिजे, याची त्यांनी जाणीव ठेवली. मतदारसंघ सांभाळण्याचे नवे मापदंड उभे केले. जनतेकडून मागणी व्हायच्या आत रस्ते, गटार योजना, मेट्रो, दवाखाने, आरोग्य व्यवस्था, पाणी, वीज, उद्योग, रोजगार, शिक्षण, गरिबी निर्मूलन, सामाजिक स्वास्थ्य, कायदा सुव्यस्था अशा सर्व आघाड्यांवर स्वतःकडूनच पुढाकार घेतला. बाहेरच्या माणसाने नागपुरात पाय टाकताच त्याला नागपूरचा चेहरा मोहरा बदललेला दिसतो. एरवी देश सांभाळणारा नेता मतदारसंघात फारसा उपलब्ध नसतो. पण नितीनजी यालाही अपवाद आहेत. हजारो लोकांना नियमित भेटण्याचा पायंडा त्यांनी पाडला. सर्वसामान्य, गोरगरीब लोकांना तात्काळ मदतीचा हात मिळतो. आपला नेता आपल्याला भेटतो, ऐकतो हा देखील लोकांच्या समाधानाचा विषय असतो. नितीनजींच्या मतदारसंघाचा विकास होतो, मोदीजींच्या मतदारसंघाचा विकास होतो, त्या पाठोपाठ इतरही नेते आपल्या विस्तारलेल्या कार्यक्षेत्रासह मतदारसंघाकडेही लक्ष देतात. नव्हे तर पूर्ण न्याय देतात, हे लोकांच्या लक्षात आल्यावर राहुल गांधींना अमेठीतून पराभव पत्करावा लागतो. ज्योतिरादित्य सिंधिया, सुशीलकुमार शिंदे अशा दिगगजांना आपापल्या परंपरागत मतदारसंघात पराभव पत्करावा लागतो.

बाळासाहेब थोरातांचा नारायण राणेंना टोला, म्हणाले…

आजच्या भाजपाच्या यशात नितीनजींनी देशभर केलेल्या विकासकामांचे मोठे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीनजींच्या कामांची प्रशंसा करणे स्वाभाविक आहे. पण राहुल गांधी, सोनिया गांधी, शरदचंद्र पवार, अखिलेश आणि चंद्राबाबू यांनाही नितीनजींच्या कामांवर प्रशंसा करण्यास बाध्य व्हावे लागते, ही खरी पावती आहे. हाती घेतलेल्या कामाचे नितीनजी सोनं करतात. काही महिन्यात त्यांनी गंगा शुद्ध केली. प्रियंका वडेरा गांधी गंगेतील मार्गाची तपासणी करायला जातात आणि अखेर ओंजळभर गंगाजल प्राशन करतात, यापेक्षा गंगाशुद्धीकरणाचा मोठा पुरावा नाही !

जात, धर्म, पक्ष असा कोणताही भेद आड न येऊ देता काम करणारा नेता हा नितीजींविषयीचा लोकानुभव आहे. नागपूरवर त्यांचे विशेष प्रेम आहेच पण त्यांनी विदर्भावरची आपली माया कधी पातळ होऊ दिली नाही. आज विदर्भातील विकासाच्या आणि जलसिंचनाच्या क्षेत्रातील अनुशेष निर्मूलनात त्यांनी क्रांतीकारी कार्य केले. शेतकऱ्यांविषयी त्यांना अपार कळवळा आहे. ते सर्वच क्षेत्रात अविश्रांत धडपड करीत असताना लोकांच्या अपेक्षा आणखी वाढत असतील तर मी लोकांना दोष देत नाही. खरं पाहिलं तर विदर्भातल्या कोणत्याही मतदारसंघातून नितीनजी उभे राहिले तर लोक त्यांनाच निवडून देतील एवढे कष्ट त्यांनी वैदर्भीयांसाठी उचलले आहेत.

लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल – सुभाष देसाई

आम्ही भाजपाचे काही प्रवक्ते उत्तराखंडात गेलो होतो. गंगोत्री मंदिराचे दरवाजे अक्षय्यतृतीयेला उघडतात. तोपर्यंत उत्तरकाशीच्या पुढे गंगोत्रीच्या रस्त्याने चिटपाखरूही नसते. अभी उधर न जाये तो ही अच्छा, असे काही लोकांनी आम्हाला सांगितले. मात्र, आम्ही जेवढे जाता येईल तेवढे जायचे असे ठरवून गंगोत्रीच्या दिशेने जायचे ठरवले. पूर्वी हा प्रवास खडतर असायचा. मात्र, आमचे वाहन सहज पुढे सरकत होते. प्रत्येक मैलावर रस्त्याचे रुंदीकरण युद्ध स्तरावर सुरु होते. दरड कोसळण्याच्या शक्यतेच्या स्थानावर दगडी भिंती बांधणे सुरु होते. काही बोगदे बांधले जात आहेत. हा प्रवास अधिक सुलभ कसा होईल, याची तयारी युद्धस्तरावर सुरु होती.

एका धाब्यावर सहज चौकशी केली, तर धाबेवाला नितीनजी गडकरी यांची प्रशंसा करीत होता. अरे भाई गडकरी साहाब बडी ताकदसे भिडे है ! … अब देवभूमीमे रास्तोंकी चिंता नही रहेगी ! चार धाम के दर्शन के लिये अब कठिनाई नही होगी.. गावकरी गडकरी साहेब काय काय करणार, याची माहिती आनंदाने सांगत होते. प्रत्येक ठिकाणी रस्ते बांधण्याचे काम सुरु होते. स्थानिक जनता मुक्त कंठाने याचे श्रेय गडकरींना देत होती. नितीनजींच्या कामाची ही व्याप्ती आणि जनतेकडून त्याला मिळणारी पावती पाहून आम्ही मनोमन सुखावलो. स्वाभाविकपणे आम्हाला गर्वही वाटला. त्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चारधामला जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी भूमिपूजन करण्यात आले. यावर बारा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधानांनी तर नितीनजींना श्रावण बाळाची उपमा देऊन त्यांचा विशेष गौरव केला.

श्रावण बाळाने आपल्या वृद्ध व अंध माता – पित्यांना कावडीने यात्रेला नेले होते. या नव्या युगात यात्रा करणाऱयांसाठी गडकरी श्रावण बाळ असल्याची पावती मोदींनी दिली. नितीन गडकरी हे नेहमीच जगभरातील चांगल्या गोष्टींचा शोध घेत असतात. विद्यमान केंद्र सरकारच्या लोकप्रियतेत नितीनजींच्या नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा, कल्पकतेचा आणि योजना राबविण्याच्या क्षमतेचा सिंहाचा वाटा आहे.

मुंबईतल्या विशालकाय उड्डाणपुलांसह विदर्भातील मेळघाट असो की राज्यातील आदिवासी बहुल गाव – पाड्यांपर्यंत बारमाही रस्ता पोहोचवण्याची किमया राज्यात नितीनजींनी करून दाखवली होती. आता देश पातळीवर विकासाचे एकाहून एक सरस उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी नितीनजी सिद्ध झाले आहेत. रस्ते विकासाची गंगा देशभर सर्वत्र वाहते आहे.

मनमोहनसिंह सरकारच्या काळात रस्ते बांधणी उद्योग ठप्प झालेला होता. काऱण विविध परवानग्यांमध्ये प्रकल्प अडकलेले होते. कामे होत नव्हती. त्यामुळे खाजगी कंत्राटदारही अडचणीत आले होते. पळून जात होते. नितीनजींनी जेंव्हा हे खाते सांभाळले तेंव्हा त्यांच्याकडे अनेक मोठे उद्योजक येत होते. पण काम मागण्यांसाठी नव्हे तर आम्हाला दिलेले काम परत घ्या आणि मोकळे करा, हे सांगण्यासाठी. त्यातून नितीनजींनी मार्ग काढला. ठप्प पडलेले शेकडो रस्ते प्रकल्प मार्गी लावले. आता देशभर वेगाने कामे सुरु आहेत. नितीनजी मोठी स्वप्न पाहतात आणि पाहता पाहता त्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारतात. गगनाला गवसणी घालणारी कामे नितीनजीच करू जाणोत. आकांक्षांपुढती जेथ गगन ठेंगणे, अशा आशयाच्या अनेक ओळी आपण विविध कवितांमधून नियमितपणे ऐकत असतो. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे, अशा आशयाच्या प्रोत्साहित करणाऱ्या अनेक म्हणी व वाकप्रचारही आपल्याला माहीत आहेत. त्याचे विविध अर्थही आपण शोधत असतो. पण त्याचे उदाहरण द्या, असे जर कोणी म्हटले तर मला उत्तर दिसते, ते म्हणजे नितीन गडकरी !

नितीनजींनी प्रथम नागपूरवर, मग विदर्भावर, संपूर्ण महाराष्ट्रावर आणि पाहता पाहता देश पातळीवर आपल्या अचाट कर्तृत्वाची अमिट छाप उमटवली आहे. विकासाचा महामेरू हे संबोधन त्यांना सार्थ ठरते. संघटनेच्या आणि पक्षवाढीच्या पातळीवरही नितीनजींचे कार्य अजोड आहे. विदर्भातल्याच नव्हे तर राज्यातील हजारो कार्यकर्त्यांना त्यांच्या नावाने ओळखणारा नेता, असा त्यांचा सर्वांना अनुभव आहे. विदर्भातील कार्यकर्त्यांचे तर नितीनजींकडे स्वाभावीकपणे पालकत्व आहे. आज जगभर ख्यातीप्राप्त असलेले नितीनजी कितीही व्यस्त असो, ते आपल्या पाठीशी उभे आहेत, हा दुर्दम्य विश्वास कार्यकर्त्यांना तर आहेच, असंख्य लोक या विश्वासावर धाडसाने रचनात्मक कामे करत असतात. देशभर काही रचनात्मक, विकासात्मक किंवा सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नितीनजी आधारवड वाटतात. आपण जेव्हा अडचणीत येऊ किंवा कोणाला तरी मदतीसाठी साद घालावी लागेल, तेव्हा नितीनजींच्या वाड्याचे दरवाजे, आपल्यासाठी खुले आहे, असे त्यांना वाटते. हा विश्वास सहजासहजी संपादन होत नसतो. दीर्घ तपश्चर्या लागते. एक अनुभव विपरीत आला तर कार्यकर्त्यांच्या मनातील प्रतिमेला तडा जातो. एखाद्या काचपात्राला तडा गेला तर तुम्ही ते कशानेही चिकटवा, काचपात्र एकसंध होत नाही. कार्यकर्ता हे प्रकरण काचपात्राएवढेच नाजूक आहे. त्याची सतत काळजी घ्यावी लागते. नितीनजींनी आपल्या आयुष्यात सातत्याने कार्यकर्ता सांभाळला. त्याला उभे केले. त्याची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रेरणेतून असंख्य कार्यकर्ते उभे झाले.

नितीनजींनी लोकप्रियतेत पक्षीय राजकारणाच्या भिंती कधीच ओलांडल्या आहेत. भाजपा विरोधकांना राजकीय दृष्ट्या नितीनजींची प्रशंसा खुले पणाने करणे शक्य नसते. पण काँग्रेस पासून तर जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांचे लोक नितीनजींचे नाव आदराने घेतात. खासगीत बोलताना ते नितीनजींच्या कामांची उदाहरणे देतात. त्यांच्या विकास कार्याने तेही प्रभावित असतात. अनेक विरोधी पक्षाचे लोक अडचणीत नितीनजींचा सल्ला व सहकार्य मागतात. त्यांना चुकीचा सल्ला कधीच मिळत नाही. भाजपाच्या हिताच्या आड येणारे काम नसेल तर त्याला संपूर्ण मदत करून संकटातून बाहेर काढण्याचे औदार्य नितीनजींजवळ आहे. यातून त्यांना त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे असंख्य चाहते प्राप्त झाले आहेत. राजकारणाच्या आखाड्यात हे नितीनजींचे फार मोठे बलस्थान आहे. वैचारिक मतभेद असतानाही अनेक राजकीय नेत्यांशी नितीनजींची अतूट मैत्री आहे. पण ही मैत्री कधीच पक्ष कार्याला बाधक ठरत नाही. पक्षाच्या ध्येय धोरणाआड येणारे वेळप्रसंगी ते वैयक्तिक मित्र असले तरी नितीनजी त्यांचा खरपूस समाचार घेतात, हे आपण कित्येकदा अनुभवले आहे.आज नितीनजी देशाचे नेते आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतो. पण वैदर्भीयांच्या हृदयात त्यांचे स्थान वेगळेच आहे. घार कितीही उंच आकाशात उडत असली तरी तिचे चित्त नेहमी पिलांपाशी असते. याच न्यायाने वैदर्भीयांना नितीनजींचा विशेष अभिमान वाटतो.

आज नितीनजींचे नाव घेताच एका विकासपुरुषाची प्रतिमा डोळ्यासमोर येते. रोडकरी, पुलकरी ही नामाभिधाने त्यांना जनतेनीच उत्स्फूर्तपणे दिली. आज नितीनजींनी विकासाच्या सर्वच क्षेत्रातील आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. विकासासाठी केवळ समकालीन विचार करून चालत नाही. वर्तमानासोबतच भविष्याचाही वेध घ्यावा लागतो. एक माणूस एका वेळी किती आघाड्यांवर काम करू शकतो, हे केवळ नितीनजीच करू जाणोत ! दिवसागणिक किती किलोमीटर रस्ता आणि किती पूल बांधले जावेत, याचे नियोजन अमलात आणताना ते देशात जलवाहतूक समृद्ध करण्याची योजना आखतात. नद्यांमधून मालवाहतूक करणे आणि त्याचे लाभ काय, हे नितीनजींच्याच भन्नाट डोक्यातून निघू शकते. बरं असे त्यांचे विचार कागदावरच राहिले, असे कधीच होत नाही. एखाद्या निष्णात आणि कुशाग्र उद्योजकाप्रमाणे संपूर्ण योजनेचे निलचित्र त्यांना मुकपाठ असते.

माणसं परखता येत असल्याने आवश्यक ते कुशल मनुष्यबळही ते उभे करतात. त्यासाठी आर्थिक स्रोत कसे उभारायचे, याचे समिकरणही त्यांच्याजवळ तयार असते. कारखाने कसे चालवावे, शेती कशी करावी, बँकांमध्ये कुठल्या सुधारणा हव्या, अशा सर्वच विषयांची त्यांना केवळ तोंडओळख नाही तर त्या सर्व विषयांवर ते कायम सिद्ध असतात. वैद्यकीय शास्त्र, पर्यावरण, आधुनिक तंत्रज्ञान, वीज निर्मिती, रोजगार, दारिद्र्य निर्मूलन अशा सर्व विषयांवर नितीनजी एकाचवेळी काम करतात. अफाट संपर्क, विलक्षण स्मरणशक्ती, माणसांच्या क्षमतांची ओळख, सर्व विषयांचे आकलन व अभ्यास, संकटांवर मात करण्याचे धाडस, जिद्द, चिकाटी, सहकाऱयांवर विश्वास आणि प्रचंड अनुभव या गुण वैशिष्टयांच्या आधारावर नितीनजींनी देशात विकासाचा झंजावात उभा केला आहे. या गतीसमोर भारतच नव्हे तर जगातील अनेक विकसनशील देश थक्क आहेत. देशासोबत आज नागपूर आणि विदर्भावरही नितीनजींनी विकास योजनांचा वर्षाव केला आहे. विदर्भभर कोट्यवधी रुपयांची विकासकामे लवकरच दिसणार आहेत. नितीनजी केवळ विकासाचे नव्हे तर राष्ट्र पुनरबांधणीचे शिल्पकार आहेत. अरुणोदय हो चुका वीर अब कर्मक्षेत्र में जुट जाये, अपने खून पसिने द्वारा नवयुग धरती पर लाये। या गीताच्या ओळी नितीनजींनी आपल्या आयुष्यात सार्थ केल्या. ध्येय प्राप्तीसाठी त्यांचे अफाट परिश्रम अव्याहत सुरु आहेत. जन्मदिनानिमित्त नितीनजींना कोटी कोटी शुभेच्छा !!