पुणे: नागपूर-काटोल चौपदरी रस्त्याचा शुभारंभ झाला. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामासाठी आलेल्या अडचणी तसेच त्यातून निघलेले मार्ग याबद्दल अनेक किस्से सांगितले. नितीन गडकरी म्हणाले, या रस्त्यासाठी अनेक अडचणी आल्या. वनविभागाने हा वाघांचा जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले होते त्यामुळे तिथून रास्ता करणे शक्य नाही.
नागपूर-काटोल चौपदरी रस्त्याच्या कामांमध्ये आलेल्या अडचणी बद्दल सांगताना गडकरी पुढे म्हणाले, वनविभागाने हा वाघांच्या जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले. वास्तविक इतक्या वर्षात इथे कुठल्याही गावात वाघ शिरला नाही. मात्र, वाघाच्या अधिवासाचे कारण सांगत वन विभागाने मंजुरी देण्यास नकार दिला होता. मात्र यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मदत केली.
काटोल नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/ZzouxZqAqB
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 2, 2022
या रस्त्याचा कामासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मदत केली म्हणून वन विभागाने या कामाला मंजुरी दिली.अन्यथा हे काम मार्गी लागले नसते. वाघाच्या अधिवासाचे कारण सांगत मंजुरी देण्यात येत नव्हती. तेव्हा अनिल देशमुख यांनी मदत केली आणि वनविभागाची परवानगी या रस्त्याच्या कामासाठी मिळाली आणि म्हणून त्यांचे मी आभार मानतो, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी माजी गृहमंत्री यांचे आभार मानले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मी अजित दादांचा फॅन’; भाजप आमदाराने कौतुक करताच राष्ट्रवादीची ऑफर
- पहिल्या किसान रेल्वेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
- ओमायक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; जाणून घ्या काय म्हणाले AIIMS चे संचालक
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<