fbpx

विरोधी पक्षात गेले म्हणून काय झालं, माझा आशीर्वाद अजूनही पटोलेंच्या पाठीशी

nitin-gadkari

टीम महाराष्ट्र देशा : राजकारणात माझा कोणीही शत्रू नाही अस म्हणणाऱ्या नितीन गडकरी यांनी एकेकाळचा पक्षमित्र असणाऱ्या आणि सध्या कॉंग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या नाना पटोले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नितीन गडकरी आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी नाना पटोले यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.

येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाना पटोले हे नागपूर मध्ये कॉंग्रेसकडून केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध लढणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की , नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला, असे नाही. ते तरुण आहेत, त्यांनीही लढले पाहिजे. तसेच नाना पटोले हे पूर्वीही माझे मित्र होते आणि आताही माझे मित्र आहेत, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

दरम्यान, नाना पटोले हे एकेकाळी नितीन गडकरी यांचे घनिष्ठ सहकारी होते. मधल्या काळात भाजप नेतृत्वासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने आता त्यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून थेट नितीन गडकरी यांच्याविरोधातच उमेदवारी दिली आहे.