सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगरला ब्रॉडगेज मेट्रोने पुण्याशी जोडणार – नितीन गडकरी

nitin gadkari

टीम महाराष्ट्र देशा: पुन्हा एकदा भाजप सरकार आल्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर तसेच लोणावळा भागाला पुण्याशी जोडण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रो उभारणार असून, हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

कॉंग्रेस देशाचा विकास करू शकत नाही, त्यामुळे आता जात, धर्माच्या नावावर मतं मागत आहे. जनतेने देखील विकासावर भर देणाऱ्या सरकारला पाठींबा देणे गरजेचं आहे. ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना कॉंग्रेसला देशाचा विकास करता आला नाही, परंतु त्यांनी देशाचा सत्यानाश केला. अशी टीका यावेळी गडकरी यांनी केली.

Loading...

शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री असतानाही विमानतळाचे विस्तारीकरण केले नाही, मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर पुण्याच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावला. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्कायवे, मुळा – मुठा नदीतून जलमार्ग निर्माण करण्याचं काम आगामी काळात भाजप सरकारकडून केले जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'