सत्तेत येण्याची खात्री नसल्याने मोठमोठी आश्वासने दिली : नितीन गडकरी

nitin-gadkari

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेलं विधान पक्षासाठी डोकंदुखी ठरु शकतं. टोलमुक्तीच्या आश्वासनाबद्दल केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,’आम्ही सत्तेत कधीच येणार नाही, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्हाला मोठमोठी आश्वासनं देण्याचा सल्ला दिला होता.’ गडकरी यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

नेमकं काय म्हणाले गडकरी ?
‘मी दोन-तीन गोष्टींबाबत मी देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथ मुंडे यांना टोलबद्दल काही बोलू नका असं सांगितलं होतं. सध्या याबाबता काही जाहीर करु नये, अशा भूमिकेत मी होतो. पण आमचा काय प्रॉब्लेम होता हे मी सांगतो. आमचा सगळ्यांचा एवढा दृढ विश्वास होता, इतका प्रखर आत्मविश्वास होता की आयुष्यात कधी आम्ही राज्यावर येतच नाही. त्यामुळे आमच्या आजूबाजूचे लोक म्हणायचे, बोला ना, सांगा ना बिघडतंय काय? तुमच्यावर कोणती जबाबदारी येणार आहे. आता आमचं राज्य आलं. कोणत्या तारखेला गडकरी काय बोलले? फडणवीस काय बोलले? जनता आम्हाला त्या आश्वासनांची आठवण करुन देते, मात्र सध्या आम्ही त्यावर हसतो आणि पुढे जातो’.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यास विकासकामांवर परिणाम होईल: नितीन गडकरी

हसण्यासारखं वागावं म्हटलं तर तुम्ही म्हणाल याला काय वेड लागलंय का? : अजित पवार