‘आमच्या दोन मोठ्या नेत्यांचं असं अचानक जाणं हा आमच्यासाठी वज्राघात’

blank

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दुख:द निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीचं अरुण जेटली यांची प्रकृती खालावली होती. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटली यांच्या निधन वार्तेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या दोन मोठ्या नेत्यांच एका पाठोपाठ अस अचानक जाणं हा आमच्यासाठी एक वज्राघात आहे. अरुण जेटली यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली आहे. तर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील भावूक झाले आहेत. अरुण जेटली यांच्या जाण्यान माझ वैयक्तिक नुकसान झाल आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान अरुण जेटली यांना प्रकृतीच्या कारणास्तव ९ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. तसेच अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव २०१९च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. अरुण जेटली हे देशाच्या राजकारणातील मोठे नेते होते. त्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात देशाच्या अर्थखात्याची जबाबदारी स्वीकारली होती.