लखनऊ : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर येथे रविवारी भाजपाच्या जन विश्वास यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यानंतर आपल्या भाषणात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे तोंडभरून कौतुक केले.
भाजपा पक्ष उत्तरप्रदेश मध्ये केवळ गुंडागर्दी संपवत नाहीये, तर राज्यातील गरिबी, भूखमारी, बेरोजगारी संपवत आहे. पाच वर्षांत तुम्ही जे बघितले तो फक्त एक ट्रेलर होता. खरी फिल्म तर अजून बाकी आहे. असे विधान करत त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारला निवडून आणा, मग बघा काय चमत्कार होतो. असेही नितीन गडकरी म्हणाले आहेत.
बिजनौर, उत्तर प्रदेश में जन विश्वास यात्रा और जनसभा कार्यक्रम से लाइव। #जन_विश्वास_यात्रा https://t.co/JNQP1NFDVC
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 19, 2021
तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात २०१४ साली रामराज्याची सुरुवात झाली. २०१४ साली उत्तर प्रदेश कसे होते, आणि आज कसे आहे हे तुम्हाला दिसतच आहे. गेल्या ५० वर्षांत जेवढा रस्त्यांचा विकास झाला नाही, तो गेल्या पाच वर्षांत भाजपाने केला आहे. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग उत्तर प्रदेशला जोडला जाणार असल्याचेही म्हटले आहे. दिल्ली ते डेहराडून हा नवा मार्ग करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. पुढील दोन वर्षांत दिल्ली ते डेहराडून अंतर केवळ २ तासांत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दिल्ली ते चंडीगढ़ दोन तास, दिल्ली ते जयपुर दोन तास, दिल्ली ते अमृतसर चार तास, दिल्ली ते कटरा सहा तास आणि दिल्ली ते श्रीनगर फक्त आठ तासात पोहोचण्याचे काम आम्ही करू. असे आश्वासनही नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या
- ”दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय?”; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका
- ‘भाजपावाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच!’
- ‘… महाराष्ट्रात व देशात हे खपवून घेतलं जाणार नाही’, निलेश राणेंचा इशारा
- ”जयंतराव, हा शहाणपणा राजू नवघरे आणि नवाब मलिकांना सांगा”
- …पण ह्या राष्ट्रवादी आमदार राजू नवघरेचं काय करायचं? नितेश राणेंचा टोला