राज्य सरकारने मनात आणल्यास पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात : गडकरी

पुणे – पेट्रोल डिझेलला जीएसटी मध्ये आणण्यासाठी राज्य सरकारने मागणी केली तर इंधनाचे दर 7 ते 8 रुपयांनी कमी होऊ शकतात अस विधान करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील इंधनाच्या जादा दराचा मुद्दा राज्याच्या गळ्यात मारला आहे, इंधनाचे दर कमी कसे होतील यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू आल्याच ही ते म्हणाले.केंद्र सरकारच्या चार वर्षातील योजना, विकास कामांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजवेच लागतील असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी टोलचं समर्थन केलं आहे. टोलमुक्ती शक्य नसल्याचं देखील त्यांनी आज पुण्यात पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान ठणकावून सांगितले.देशात रस्ते बांधणीची काम जोरात सुरू असून पुणे सातारा रस्त्याचं 128 किमीच काम सुरू आहे मात्र गेल्या काही काळापासून 12 किमीच काम रखडलेल आहे मात्र हे काम पाच डिसेंबर पर्यत पूर्ण होईल अस गडकरी म्हणाले यावेळी बोलताना रस्त्याचा विकास हवा असेल तर टोल भरावा लागेल अस।पुन्हा एकदा सांगितलं, रस्ते बांधणीसाठी झाडं तोडावी लागतात मात्र त्याला विरोध होतो मध्ये येणारी झाडं तोडली नाहीतर रस्त्याचं रुंदीकरण कस होणार असा प्रश्न उपस्थित करत रस्त्यावर झाडं लावण्यासाठी कोणी पुढे येणार असेल तर प्रत्येक किलोमीटर ला 15 लाख रुपये अनुदान आपण देऊ अस गडकरींनी जाहीर केल.