आमच्यावर आरोप करणाऱ्या कॉंग्रेसने आजपर्यंत कॉंग्रेसने 72 वेळा घटना बदलली : गडकरी

टीम महाराष्ट्र देशा- आमच्यावर घटना बदलणार असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जातात मात्र आजपर्यंत कॉंग्रेसने 72 वेळा घटना बदलली असा सणसणीत टोला केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसला लगावला.निवडणुका आल्यावर जातीयवादाची भीती निर्माण केली जाते.पुण्याजवळ घडलेली घटनेचा उल्लेख करत जातीयवादाचं राजकारण करणाऱ्यांवर गडकरींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

केंद्र सरकारच्या चार वर्षातील योजना, विकास कामांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकाबाबत बोलताना ईव्हीएम वरून आरोप करणाऱ्या विरोधकांना गडकरींनी लक्ष केलं. आम्ही जिंकलो की ईव्हीएम खराब आणि दुसरे जिंकले की चांगलं अशी विरोधकांची सध्या स्थिती आहे, भंडारा गोंदिया मध्ये मतदान झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल ईव्हीएम च्या विरोधात बोलत होते आता जिंकल्यानंतर काय अस गडकरी म्हणाले. काँग्रेसने आणि आम्ही घटना बदलणार असल्याचे आरोप होतात अस ही गडकरी म्हणाले.