कन्‍नड औट्रम घाटाचे त्वरित सुरू करण्याचे गडकरी यांचे आदेश

नितीन गडकरी

औरंगाबाद  : परवाच्या जोरदार पावसामुळे ढासळलेल्या कन्नड औट्रम घाटाची खासदार खैरे यांनी वनविभाग, राष्ट्रीय महामार्ग अधिका-यांसह पाहणी केली. कन्नड औट्रम घाट हा अतिशय रहदारी व महत्वाचा असून मराठवाड्याची जीवनवाहिनी असल्याने कन्नड – चाळीसगाव औट्रम घाटाच्या दुरूस्तीच्या कामांस गती देण्याची सूचना शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.

रस्तेकामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही त्वरित सुरु करण्याचे आदेश दिलेले आहेत. सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग 211 (53) नवीन कामांबाबत 31 जुलै रोजी कन्नड येथे खासदार चंद्रकांत खैरे , राष्ट्रीय महामार्गचे महाराष्ट्र इन्चार्ज चंद्रशेखर, मराठवाडा इन्चार्ज घोटकर, वनाधिकारी कमलाकर धामगे , पी के महाजन , अनिलकुमार चक्रबोर्ती , जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आदींनी स्थळपाहणी करून घाट धोकादायक असल्याचे सर्वेक्षण केले होते.

कन्नड चाळीसगाव औट्रम घाटातील दोन दिवसापूर्वी काही भाग अतिवृष्टि व भिजपावसामुळे खचून गेला होता. तात्कळ प्रशासनाने रस्ता बंद करून अपघात टाळला, परंतु दोन ते तीन महिने बंद न ठेवता दिड महिन्यात मजबूत काम करून रस्ता सुरळीत करण्याचे आदेश खासदार चंद्रकांत खैरे यांनी राष्ट्रीय महामार्गचे महाराष्ट्र इन्चार्ज श्री चंद्रशेखर, मराठवाडा इन्चार्ज घोटकर यांना दिले.