लग्न समारंभात कोल्ड्रिंकऐवजी दुधाचं वाटप करा – नितीन गडकरी

नागपूर : लग्न समारंभात कोल्ड्रिंकच्या ऐवजी दुधाचं वाटप करा आणि शेतकऱ्यांना जगवा असं आव्हान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते नागपुरात मदर डेअरीने आयोजित केलेल्या गिफ्ट मिल्क या कार्यक्रमात बोलत होते.

लग्न वा समारंभामध्ये कोल्ड्रिंकऐवजी पाहुण्यांना दुधाचा पाहुणचार दिला तर त्यांचे आरोग्य सुधारेल. शिवाय दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तेही जगतील असे, नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच दूध उत्पादकांच्या आंदोलनानंतर सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याची मागणी मान्य केली होती. त्यामुळे दुधाला २५ प्रतिलिटर भाव मिळाला होता. दूध महासंघाला २५ रुपयांपेक्षा कमी भाव देता येणार नाही असे सरकारने निक्षून सांगितलं आहे. २१ जुलैपासून हा निर्णय लागू झाला.

Rohan Deshmukh

आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये : नितीन गडकरी

देवा मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, खा राजू शेट्टींचा पंढरपुरमध्ये विठ्ठलाला तर पुण्यात दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक

Latur Advt
You might also like
Comments
Loading...