अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकलं पाहिजे : नितीन गडकरी

Union Minister Nitin Gadkari

पुणे : यशाचे बाप अनेक असतात पण अपयश अनाथ असते. अपयश आल्यावर कमिटी बसते तर विजयावर आनंद व्यक्त केला जातो. मात्र अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकलं पाहिजे असे सूचक विधान केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलते होते.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशच्या वतीने आयोजित नागरी बँकांच्या गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सहकार क्षेत्रातील योगदानबद्दल शिलाताई काळे यांना जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिखर बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील यश हे सहकारी चळवळीमुळे नाही तर नेतृत्वामुळे असते. सहकारामध्ये कॉर्पोरेट नको पण प्रोफेशनलिझम असायला हवा. बँकांची क्रेडीबिलिटी हे एकविसाव्या शतकातील सगळ्यात मोठ भांडवल आहे. व्यवसायिकता, फर्निचर, आवश्यक आहे. पण त्यात बसणारा माणूस सगळ्यात महत्वाचं असल्याचं गडकरी म्हणाले.

राष्ट्रीयकृत बँकाच्या तुलनेत नागरी बँकांना सापत्न वागणूक दिली जाते. राष्ट्रीय बँकांना ज्या प्रकारे सरकार पैसे पुरवते तसे नागरी बँकांना देखील मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी नागरी बँकांना चालना देणे आवश्यक असल्याचं मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं.

1 Comment

Click here to post a comment