Nitin Gadkari | नागपुर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाऊन राज्यात नवं शिंदे सरकार अस्तित्वात आलं. यावेळी शिवसेना पक्षाचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी उद्धव ठाकरे सोडून एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल. यानंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. मोदी सरकारमधील स्पष्टवक्ता म्हणून नितीन गडकरींना ओळखलं जात.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले, त्यानिमित्त शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार करताना आला. यावेळी मी गिरीश भाऊंना नेहमी म्हटलं राजकारण करू नका. मलाही वाटतं राजकारण केव्हा सोडावं आणि केव्हा नाही. राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी जीवनात करण्यासारख्या आहेत. गिरीशभाऊंनी पर्यावरण क्षेत्रात मोठं काम केलं आहे. गिरीश गांधी गुरुजींनी आम्हाला वृक्षारोपण करायला शिकवलं. पर्यावरणाची मला तेव्हापासून गोडी लागली, असं नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी आजपर्यंत बॅनर लावला नाही. उंदरासारखे आमचे फोटो लावतात आणि खाली स्वत:चा मोठा फोटो लावतो असा टोला गडकरींनी राजकारणात बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांना लगावला. आता खऱ्या अर्थाने ‘राजकारण’ या शब्दाचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आहे की सत्ताकारण? आहे. जुन्या काळात महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने जे कार्य झाले, ते राजकारण होतं पण ते राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण होतं. परंतु सध्या १०० टक्के सत्ताकारण आहे, असे गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Monkeypox | केरळ पाठोपाठ दिल्लीतही आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण; WHO कडून आरोग्य आणीबाणी घोषित
- Nitin Gadkari | … उंदरासारखे आमचे फोटो लावतात, स्वतःचा मोठा फोटो लावतात – नितीन गडकरी
- Rohit Pawar : “शरद पवार आणि अजित पवार मार्गदर्शन करतील पण निर्णय…”, रोहित पवारांच मोठं वक्तव्य
- Sachin Ahir : उध्दव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडली – सचिन अहिर
- Sanjay raut | पोटातील मळमळ ओठावर आली, चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरचं पाणी दाखवलं – संजय राऊत
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<