नागपूर : नागपूरमधील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ-एनएलयूने स्वतःच्या जबाबदारीवर तसेच शासनाच्या मदतीने विद्यापीठाचे विस्तारीकरण करून एनएलयू नागपूरला जगातील श्रेष्ठ विधी विद्यापीठ बनवावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले .
ते नागपूरच्या वर्धा रोडवरील वारंगा कॅम्पस येथील एनएलयूच्या वसतीगृह व अम्नेटी बिल्डींगचे उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. या वसतीगृहाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती पी. नरसिम्हा, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विजेंदर कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<