मोदी सरकारचे खातेवाटप: नितीन गडकरी सांभाळणार परिवहन खात्याची जबाबदारी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर गुरुवारी मोदी सरकारचा शपथविधी पार पडला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी यांच्यासह 57 मंत्र्यांचा समावेश आहे.

काल शपथविधी झाल्यानंतर आज सर्व मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले जात आहे. यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे देशाच्या भूपृष्ठ वाहतूक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिशय महत्वाच आणि जबादारीच मानल जाणार हे खात आहे.

मोदी सरकार एकमध्ये देखील नितीन गडकरी यांच्याकडे याच खात्याची जबाबदारी होती. तर या खात्यात नितीन गडकरी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे मोदी सरकारच्या या मंत्रिमंडळात देखील नितीन गडकरी यांना याच खात्याची जबाबदारी दिली आहे.

नितीन गडकरी यांचा राजकीय प्रवास

  • जन्म २७ मे १९५७
  • १६ व्या लोकसभेचे सदस्य
  • भारताचे केंद्रीय मंत्री मंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री
  • भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष
  • नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार
  • भाजपचे सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक
  • २०१४च्या  नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये नितीन गडकरी यांना भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरीधी पक्ष नेते