‘एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली’

टीम महाराष्ट्र देशा : ‘एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली आहे. सोलापूरचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी एक सभा आयॊजीत करण्यात आली होती. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी ही टीका केली आहे.

आपल्या धडाकेबाज भाषणात गडकरी यांनी आघाडीचा तसेच सुशीलकुमार शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘म्हातार वयात लोकसभा निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे कशाला उभे राहिले माहिती नाही. ‘मुसलमान, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूरांची गरिबी हटली का? असा सवाल गडकरी यांनी उपस्थित केला. तसेच काँग्रेस पक्षाने गरिबी हटवली, ती फक्त कार्यकर्ते, नेते, चेले चपाट्यांची गरिबी हटवली.’ असंही नितीन गडकरी म्हणाले.