आम्ही शिवसेनेपेक्षा मजबूत पण ते हे वास्तव स्वीकारण्यास तयारच नाहीत

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आणि आमच्यात वैचारिक मतभेद नाहीत. तेही हिंदुत्वाबद्दल बोलतात. त्यांची आणि आमची मते एकच आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपाच्या जागा जास्त आहेत. आम्ही तिथे मजबूत आहोत. आम्ही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवले आहे. पण ते हे वास्तव स्वीकारण्यास तयारच नाहीत. ते फक्त आम्ही मोठे भाऊ आहोत हेच सांगत आहेत. मतभेदाचे हे वैचारिक नव्हे तर राजकीय कारण असल्याची टीका केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

तर काही लोक सत्तेमुळे पक्षाला गर्व आल्याचा प्रचार करत आहेत. पण हे खरे नाही. निवडणुकीच्यावेळी आम्ही आमच्या मित्रांना बरोबर घेऊ असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी हे वक्तव्य केल आहे.