‘आमच्या जातीला आरक्षण असतं तर मी कुठेतरी बाबू झालो असतो’

nitin-gadkari

टीम महाराष्ट्र देशा:- केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणा संदर्भात मोठे विधानं केले आहे. गडकरी म्हणाले की “बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही, अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो.मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं, मला नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा व्हायचं आहे” असे विधानं त्यांनी केले आहे. ते नागपुरात अखिल माळी समाज महाधिवेशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची उपस्थिती होती.

यावेळी गडकरी पुढे बोलताना म्हणाले, मी सगळ्याच समाजाच्या कार्यक्रमात जातो, प्रत्येक समाजात मागणी असते आम्हाला राजकारणात जागा मिळाली पाहिजे, मंत्रिपद समाजाला मिळालं पाहिजे. पण मी थोडा स्पष्ट बोलतो आणि सांगतो की विशिष्ट समाजातला माणूस मंत्री झाला की त्याच्या हातून त्याच समाजाचा विकास होईल असं नाही म्हणत सगळ्याच समाजाचा विचार करावा लागतो असे ही ते यावेळी म्हणाले.

Loading...

तसेच माळी समाजातील अनेक लोक चांगले शिक्षित आहेत. शिक्षणाचा उपयोग समाज विकासासाठी व्हावा. आता खरतर सगळ्याच समाजाने रुढी परंपरेच्या बाहेर येण्याची गरज आहे, अशी अपेक्षा गडकरींनी यावेळी व्यक्त केली. या बरोबरच प्रत्येक समाजाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. अनेक समाजात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पण त्यांचा विकास झाला नाही. तो करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्न केल्यास कुठलंच कार्य अशक्य नाही त्यासाठी समाजातील जागरुकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं गडकरी यावेळी बोलताना  म्हणाले.

मी १५ हजार ग्रामीण भागातील युवकांना रोजगार दिला, त्यात माझ्या समाजाचे ५०  सुद्धा नाहीत. मी जाती- धर्म मानत नाही. प्रत्येकासाठी काम करतो, असंही नितीन गडकरींनी सांगितलं.जे लोक कर्तृत्वाने हरतात ते तिकीट मागण्यासाठी जातीचा आधार घेतात. आरक्षण मिळाल्याने सगळा विकास होतो असं नाही. कर्तृत्व सुद्धा विकास घडवते. म्हणून आपण करतो त्या कामाला सुद्धा महत्व दिलं पाहिजे, असे ही गडकरींनी  सांगितले.

दरम्यान ते म्हणाले आम्ही असे नेते तयार केले पाहिजे जे देशाला विकासाच्या कक्षेत आणेल, राज्याच्या विकासासाठी काम करेल. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची माळी समाजाची मागणी आहे त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार, असे ही गडकरींनी यावेळी आश्वासन दिले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार