दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे शहरातील स्थानिक नागरिकांना टोल भरावा लागणार नाहीये. याबद्दलचे अधिकृत निर्णय लवकरच घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात नितीन गाडीकरी यांना तोल संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिले.
राज्यसभेत ‘अण्णा द्रमुक’चे नेते एम. थंबीदुराई यांनी गडकरी यांना शहरातील नागरिकांना एक्स्प्रेस वेच्या कमी वापरासाठीही टोलनाक्यावर तेवढाच टोल भरावा लागतो, असे निदर्शनास आणून दिले. त्यावर गडकरी म्हणाले कि, “सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, पण मीच ‘फादर ऑफ टोल टॅक्स’ आहे. मी भारतात पहिल्यांदा टोल पद्धत सुरु केली. महाराष्ट्रातील ठाणे भिवंडी बायपास हा त्याचा पहिला प्रकल्प होता. पण शहरी भागाच्या टोल पद्धतीसाठी मी जबाबदार नाही. यात माझा दोष नाही. कारण हा निर्णय युपीएच्या काळात घेण्यात आला होता. परंतु आता आम्ही त्यावर काही उपाय योजना करणार आहोत. ज्यामुळे शहरातील नागरिकांना टोल भरावा लागणार नाही. टोलमधून शहरी भाग वगळला जाईल.”
पुढे त्यांनी असंही नमूद केलं कि, “शहरातील नागरिकांना १० किमी प्रवास करण्यासाठीही ७५ किमीच्या दराने टोल भरावा लागत आहे. हे खरंच दुर्दैवी आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही एक नवीन पद्धत सुरू करणार आहोत, ज्यात शहरी भागातील नागरिकांचा टोल माफ केला जाईल. मी तुमच्या आणि जनतेच्या भावना समजू शकतो, माझीही तीच भावना आहे. त्यामुळे लवकरच या पद्धतीत दुरुस्ती करू”, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- बॉलिवूड अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन, ‘या’ बड्या कलाकारांसोबत साकारली आहे भूमिका
- Amol Mitkari | हर घर तिरंगा मोहीम नसून भारतीय ध्वजाचे व्यावसायिकरण – अमोल मिटकरी
- Amruta Fadnavis | “मंगळसूत्र घातल्यावर पतीने गळाच पकडलाय असं वाटतं”; अमृता फडणवीसांचं बोल्ड विधान
- Uddhav Thackeray Vs Eknath Shinde SC | पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका! न्यायालयाचा आदेश, सोमवारी होणार पुढील सुनावणी
- ZIM vs BAN : भारताविरुद्ध भिडण्याअगोदर झिम्बाब्वेने दाखवली ताकद; टी-२० मालिकेत बांगलादेशला नमवले!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<