‘तुम्ही माझा हात पकडलाय, आता कुठेही जा’, गडकरींचा राणेंना चिमटा

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या इंग्रजी आत्मचरित्र ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘तुम्ही माझा हात पकडलाय, आता कुठेही जा’, असे म्हणत गडकरींनी राणेंना चिमटा काढला आहे. तसेच पुढे बोलताना गडकरी म्हणाले, राजे कोणत्याही पक्षात गेले तरी माझे मित्र राहतील.

तसेच पुढे म्हणाले, पुस्तकात फक्त २५ टक्के चा इतिहास आहे ७५ टक्के इतिहास मात्र पुस्तकात नाही, तो फक्त माझ्या सारख्या तुमच्या सारख्या काही लोकांना माहित आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी नारायण राणे मुख्यमंत्री झाले पण कार्यकाळ कमी मिळाला, त्यांना जर पूर्ण कार्यकाळ मिळाला असता तर महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री मिळाला असता. राणे यांना शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अन्याय सहन करायचा नाही, हा त्यांचा स्वभाव त्यांना शिवसेनेत स्वस्थ बसू देत नव्हता असं विधान केले.

महत्वाच्या बातम्या