हुतात्मांच्या स्मृतीचे स्मरण हे आपले कर्तृत्व – नितीन बानगुडे पाटील

सातारा : किल्ले वर्धनगडला स्वातंत्र्य संग्रामाचा असून खटाव तालुक्याचे भूषण आहे. या गावातील पाच देशभक्तींनी स्वातंत्र्य पूर्वकाळात केलेल्या बलिदानाची स्मृती जतन करणे हे आपले कर्तृत्वच आहे. या हुतात्मा स्मारकांची डागडूजी करून येणा-या पिढीला हा देशभक्तीचा वारसा संक्रमित करणे गरजेचे आहे, असे मत शिवसेना उपनेते आणि सातारा सांगली संपर्कप्रमुख प्राध्यापक नितिन बानगुडे पाटील यांनी केले.

सरपंच तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जुन मोहिते यांच्या प्रयत्नातून आणि ना.दिपक केसरकर आणि शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या हुतात्मा स्मारक दुरूस्ती या कामाच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

किल्ले वर्धनगडाला ऐतिहासिक महत्व असून जर या गडाबरोबर गावाचा विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून त्याचबरोबर पर्यटन व्यवसायाही वाढीला चांगली मदत होणार आहे. तरुणांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेती समृद्ध करण्यासाठी केल्यास गावामध्ये सुभलता येईल. हे हुतात्मा स्मारक अत्यंत चांगल्या दर्जाचे उभे करण्यासाठी कटीबध्द आहे. या हुतात्मा स्मारकामुळे वर्धनगडचा नावलौकिक सातारा जिल्हात ठळकपणे अधोरेखित होईल.

या स्मारकामध्ये या गावातील हुतात्मांचे तेलचितत्र, सुसज्ज ग्रंथालय आणि सभोवताली बगिचा करणार आहे याकामासाठी सरपंच अर्जुन मोहीते यांना कायम सहकार्य राहिल.यावेळी अर्जुन मोहिते म्हणाले की, बानगुडे सरांचे किल्ले वर्धनगडवर खास प्रेम असल्याने मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागत असून भविष्यातही त्यांना कायम सहकार्य राहील. या हुतात्मा स्मारकामुळे वर्धनगडच्या वैभवात मोठी भर पडेल

You might also like
Comments
Loading...