नितीन आगे हत्या प्रकरणी पुन्हा होणार सुनावणी; नव्याने खटला चालवण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा: अहमदनगरमधील खर्ड्यातील नितीन आगे हत्या प्रकरणाचा खटला नव्याने चालवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

आत या खटल्यात सर्व साक्षीदारांची साक्ष पुन्हा नोंदवली जाणार आहे. पुरावेही नव्याने सादर करावे लागणार आहे. आणि यात विशेष बाब म्हणजे, फितूर झालेल्या साक्षीदारांवर देखील कारवाई होणार आहे. फक्त एवढंच नाही, तर कोर्टानं आगे कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत. नितीन आगे खून प्रकरणात अहमदनगर सत्र आणि जिल्हा न्यायालयानं सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर नितीनच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज कोर्टानं खटला पुन्हा चालवण्याचे आदेश दिलेत.

काय आहे प्रकरण ?

नितीन राजू आगे या अल्पवयीन दलित मुलाच्या खुनाची घटना २८ एप्रिल २०१४ रोजी दुपारी १२ च्या सुमाराला घडली. यातील प्रमुख आरोपीच्या बहिणीचे व इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या नितीन आगे या तरुणाचे प्रेमसंबंध होते, दोघे एकाच म्हणजे खर्डा येथील न्यू इंग्लिश शाळेत शिकत होते. मुलीने नितीनलाच आपला पती करायचे असे सांगितले होते. त्याचा राग येऊन वरील आरोपींनी नितीनला मारहाण करत त्याचा गळा आवळून खून केला व त्याने आत्महत्या केली, असा बनाव तयार करण्यासाठी मृतदेह जवळच्याच कानिफनाथाच्या डोंगरावरील झाडाला लटकवला, अशी फिर्याद त्याचे वडील राजू नामदेव आगे यांनी दिली होती.

You might also like
Comments
Loading...