नवी दिल्ली: नीती आयोगाने (Niti Aayog) देशातील पहिला बहुआयामी गरिबी निर्देशांक (MPI) जारी केला आहे. आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गरिबीच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या पाच राज्यांपैकी चार भाजपशासित राज्ये आहेत. या चार भाजपशासित राज्यांमध्ये आघाडीवर आहे ते म्हणजे योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेश राज्य. एकीकडे फक्त विकास काम दाखवणाऱ्या योगी सरकारने मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
नीती आयोगाने जारी केलेल्या निर्देशांकानुसार, बिहारमधील (Bihar) ५१.९१ टक्के लोकसंख्या गरीब आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि जेडीयू युतीचे दीड दशक जुने सरकार आहे, तर डिसेंबर २०१९ पूर्वी भाजपशासित झारखंडमध्ये (Jharkhand) ४२.१६ टक्के लोकसंख्या गरीब आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) ३७.७९ टक्के लोक गरिबीत जगत आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार (Census), उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९.९८ कोटी आहे. त्यापैकी ३७.७९ टक्के लोकसंख्या म्हणजे ७.५५ कोटी लोकसंख्या गरीब आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बिहारची लोकसंख्या १०.४ कोटी आहे. त्यांच्या लोकसंख्येपैकी सुमारे ५२ टक्के म्हणजेच ५४ दशलक्ष लोकसंख्या दारिद्र्यात जगत आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या या अहवलातून उत्तर प्रदेश राज्याचे खरे रूपच बाहेर काढले असं म्हणलं तर त्यात वावगे ठरणार नाही.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शेवटच्या ट्रीटमेंटसाठी आज भेटणार’ म्हणत अनिल कपूरने शेअर केला व्हिडीओ
- कोरोनामुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा होणारा रद्द? बीसीसीआयने दिले अपडेट
- हे साहित्य संमेलन की राजकीय संमेलन? नेते मंत्र्यांनीच गजबजणार व्यासपीठ
- ‘…पण आता मॉफ़् ला माफी नाही’, व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोंवर राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण
- …तर देशात DRS चा वापर करण्यास नकार देऊ शकतं; न्यूझीलंडच्या खेळाडूचा टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<