बिग ब्रेकिंग : वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू स्वामी नित्यानंद देशातून फरार

blank

टीम महाराष्ट्र देशा : स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंद स्वामी देशातून फरार झाल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे. इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे. माजी शिष्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नित्यानंद याने नेपाळमार्गे भारतातून पळ काढला आहे. नेपाळला भारतीय लोक पासपोर्टशिवाय प्रवास करू शकतात. दक्षिण अमेरिकेतील एका बेटावर शरणार्थी म्हणून त्याने आश्रय मागितला आहे”, असे म्हटले जात आहे.

मात्र नित्यानंद याने कोणत्याही विमानतळ किंवा बंदरामार्गे भारतातून पळ काढला नसल्याचे कर्नाटक सीआयडीमधील स्त्रोतांनी दि न्यूज मिनिट या संकेतस्थळाला सांगितले. नित्यानंद याच्या पासपोर्टची मुदत सप्टेंबरमध्ये संपली होती आणि बलात्काराच्या खटल्यामुळे त्याचे नूतनीकरण झाले नव्हते.
योगिनी सर्वज्ञपीठम येथील आश्रम चालवण्यासाठी लहान मुलांचं अपहरण करून त्यांना देणगी गोळा करायला लावल्याप्रकरणी बुधवारी नित्यानंद यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली होती.

अहमदाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आर. व्ही. असारी म्हणाले की, “नित्यानंद परदेशात पळून गेले आहेत आणि गरज भासल्यास गुजरता पोलीस योग्यप्रकारे त्यांना ताब्यात घेईल”.

महत्वाच्या बातम्या