fbpx

‘पेंग्विन अन् नाईट लाईफची काळजी करण्याऐवजी पालिकेनं लोकांचे जीव वाचवावेत’

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१  जण गंभीर जखमी झाले. घटनेतील जखमींवर जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील पूल दुर्घटनेवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंला लक्ष्य केलं आहे. ‘पेंग्विन आणि नाईट लाईफच्या मुद्याकडे अधिक लक्ष देण्यापेक्षा पालिकेत सत्ता असलेली शिवसेना खऱ्या जिवंत माणसांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही? असा सवाल केला आहे.

आता पुन्हा एकमेकांवर आरोप करत पूलाच्या ऑडिटसाठी चर्चा सुरू होईल. परंतु यातून काहीच होणार नाही. सर्वात श्रीमंत पालिका असूनही लोकांच्या जीवाची शून्य किंमत असल्याची’ टीका नितेश राणे यांनी केली आहे.