Share

Nitesh Rane | “जास्त म्याव म्याव केलं तर…”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना गंभीर इशारा

मुंबई : अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकरण तापलं आहे. आज उमेदवारी अर्ज भरताना विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले असून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपची तोफ चालली. आम्ही गद्दारांसोबत नाही हे दाखवण्यासाठी ही निवडणूक आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देत असताना भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना गंभीर इशारा देत उद्धव ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत.

नितेश राणे यांचा घणाघात –

जेव्हा बाळा सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत निवडणूक लढवून आमदार झाल्या तेव्हा त्यांचे फोनही यांनी उचलले नाहीत. आताही लटके ताईंचा घाणेरड्या राजकारणासाठी वापर होत आहे. याचं ज्वलंत उदाहरण तृप्ती सावंत आहेत. मातोश्रीमध्ये कोणाला किती आदर मिळतो हे तृप्ती सावंत यांना विचारा. तेव्हा कोण गद्दार आणि कोणाला सहानुभुती मिळते यांचं उत्तर मिळेल, असा पलटवार नितेश राणे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप –

रमेश लटकेंचं (Ramesh Latke) काम कोणीही नाकारणार नाही. पण मातोश्रीमध्ये त्यांचा किती अपमान झाला हे त्यांनी मला अंगणेवाडीसाठी जात असताना विमानतळावर सांगितलं होतं. उद्धव ठाकरे अपमान करतात, फोन उलचत नाहीत, भेटत नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं, असा आरोप देखील राणेंनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांना इशारा –

दरम्यान, सर्वात जास्त मानसिक त्रास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटंबाने दिला आहे. याचे अनेक पुरावे आहेत. आदित्य ठाकरेंनी जास्त म्याव म्याव केली तर ते बंद करण्याची सर्व औषधं माझ्याकडे आहेत, असा थेट इशारा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकरण तापलं आहे. आज उमेदवारी अर्ज भरताना विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले असून दोघांमध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now