Nitesh Rane । मुंबई : आज शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलेला पहिला भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतीवर राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. यानंतर आता राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं येत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही, पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले, असे भावनिक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढलेत. तसेच शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती, तेव्हा काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
तर यावर बोलताना निलेश राणे म्हणाले कि, तुम्ही त्या वेळेला गुंगीत होता तर मग तुमचा मुलगा दावोसमध्ये काय धिंगाणा घालत होता? मग गुंगीत असताना तुम्ही मुलाला प्रश्न विचारू शकत नाहीत तर अन्य लोकांना विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी केलाय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्ष म्हणून स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीयेत त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे अंधारात पत्रकार परिषदा घ्याव्या लागतायत, असा टोला देखील नितेश राणेंनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Prasad Lad | आजची मुलाखत म्हणजे बॅट पण माझी, बॉल पण माझा,अंपायर पण माझा ! – प्रसाद लाड
- Neeraj Chopra : भारताला मोठा धक्का! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर
- Uddhav Thackeray | मी आजारी असताना माझ्या पाठीमागे षडयंत्र रचलं गेलं – उद्धव ठाकरे
- Prashant Jagtap : आधी भाजपच्या लांडगेंवर टीका, तर आता राष्ट्रवादीच्याच शहराध्यक्षाची आखाड पार्टी
- Sudhir Mungatiwar | “मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव होणार, अन्यथा मी ऑन कॅमेरा…” ; सुधीर मुंनगटीवार यांचा दावा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<