सिंधुदुर्ग : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.
एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
अनिल परब यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा दया आणि चौकशी ला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे!!’ असा प्रहार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे.
ओ परिवार मंत्री..
शपथ काय घेता..
शेंबूड पुसा..
राजीनामा दया आणि चौकशी ला सामोरे जा..
पुरावे तयार आहेत..
आता वस्त्रहरण अटळ आहे!!— nitesh rane (@NiteshNRane) April 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही’
- ‘सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी म्हणून निर्बंध’
- ‘बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो…’ गंभीर आरोपानंतर परबांच भावनिक स्पष्टीकरण
- पंढरपूर निवडणुकीमध्ये भाजपला आणखी एक धक्का; ‘या’ हुकुमी एक्क्याला कोरोनाचा विळखा
- निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसलेत; भाजपची बोचरी टीका