शिवसेना राजीनामा इशाऱ्याची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करा: आमदार नितेश राणेंचे गिणीस बुकला पत्र

नितेश राणे

राज्य सरकारमध्ये सत्तेत असूनही वेगवेगळ्या कारणांवरून शिवसेना कायम भाजपला आपल्या मंत्र्याचे राजीनामे देत मध्यावधी निवडणूकांचा इशारा देते. मात्र, शिवसेना केवळ धमकी देते सत्तेतून बाहेर पडण्याची त्यांची हिम्मत नसल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणेंकडून अनेक वेळा करण्यात आली आहे. आता शिवसेनेच्या या राजीनामा देण्याच्या इशाऱ्याची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी असा खोचक टोमणा लगावत आमदार नितेश राणे यांनी चक्क गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डल  पत्रच लिहिलंय. सध्या हे पत्र सोशल मीडियावर  व्हायरल झाल आहे.