आ. नितेश राणेंनी तहसीलदार कार्यालयातच भरवला दाखल्यांचा जनता दरबार

कणकवली : कणकवली तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यात विलंब होतोय. यात अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता होती. ही बाब समजताच आमदार नीतेश राणे यांनी अचानक तहसील कार्यालयाला भेट दिली. तब्बल ४०० हून अधिक दाखले प्रलंबित असल्याचे समजताच त्यांनी तहसीलदार, नायब तहसीलदारांना धारेवर धरले.

Loading...

आ. नितेश राणेंच्या दणक्याने तातडीने महसूल यंत्रणा हलली. आतापर्यंत इंटरनेटचा वेग कमी असल्याची कारणे दिली जात होती. पण नितेश राणेंच्या पुढ्यातच अवघ्या २ तासात ६० दाखले देण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली. यानंतर नितेश राणे यांनी स्टॅम्प वेंडर गॅलरी ते थेट दुय्यम निबंधक कार्यालयापर्यंत मोर्चा वळवला. राणेंच्या या अचानक इंट्रीमुळे संपूर्ण महसूल यंत्रणा कामाला लागली होती.Loading…


Loading…

Loading...