हे सरकार चपट्या पायाचे, सत्तेत आल्यापासून…; नितेश राणेंची टीका

हे सरकार चपट्या पायाचे, सत्तेत आल्यापासून…; नितेश राणेंची टीका

Nitesh Rane Uddhav Thackeray

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षण आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. ‘महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे’, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.

राज्यातील ठाकरे सरकार हे चपट्या पायाचे सरकार आहे. हे सरकार आल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून राज्याला पनवती लागली आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. नितेश राणे यामी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली आहे. ‘या सरकारवर कोणीही अपेक्षा ठेवू शकत नाही. मराठा आरक्षणाच्या विषयावर या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. लोकांना फसवले आहे. त्यामुळे मराठा समाजाने या सरकारकडून नेमकी काय अपेक्षा ठेवावी’, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

राज्यात टाचणी पडली किंवा यांच्या घरात पाणी आले नाही की हे केंद्राकडे बोट दाखवतात. सगळे सांगत होते केंद्रामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. संसदेमध्ये एक कायदा पारित केला गेला. त्यात आरक्षण कुठल्या समाजाला किती, कसं द्यायचं, याचे सगळे अधिकार राज्य सरकारचे असल्याचं या कायद्यात नमूद करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये पण या सगळयाची जबाबदारी राज्य सरकारवर दिलेली आहे. या अगोदर राणे समिती स्थापन झाली आघडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले गेले. राज्य सरकारला अधिकार दिले. राज्य सरकार आपल्या अधिकार चौकटीत आरक्षण देऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एवढी ताकद दिली होती की, त्यांना केंद्राकडे हात पसरण्याची गरज नाही. एवढी ताकद त्या घटनेत आहे. असे यावेळी नितेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या