मुंबई: कर्नाटकातील बंगळुरूमध्ये गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी अशा समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा मुद्द्यावर भाजप मात्र मूग गिळून बसल्याची टीकाही महाविकास आघाडी नेत्यांनी केली आहे. दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींचा अपमान करणाऱ्या अवलादींना धडा मिळालाच पाहीजे. पण ह्या राष्ट्रवादी आमदार राजू नवघरेचं काय करायचं? असा सवाल करणारे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे. तसेच यामध्ये त्यांनी आमदार राजू नवघरे शिवाजी महाराज यांच्या घोड्यावर चढत पुष्पहार अर्पण करतानाचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. राजू नवघरे यांच्या या कृत्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादीवर भाजपने प्रचंड टीका केली होती. आता याचाच संदर्भ देत भाजपने पलटवार केला आहे.
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींचा अपमान करणाऱ्या अवलादींना धडा मिळालाच पाहीजे. पण ह्या राष्ट्रवादी आमदार राजू नवघरेचं काय करायचं? pic.twitter.com/XXAY3F2Axk
— nitesh rane (@NiteshNRane) December 20, 2021
काय होती ती घटना?
वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार होता. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झाले, त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेट घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित होते. मात्र त्यानंतर भाजपने हे प्रकरण उचलून धरले होते. आज भाजपशासित प्रदेश कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपवर टीका केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचासोबत काल महाराजांचा दुग्धाभिषेक केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ”दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय?”; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका
- ‘भाजपावाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच!’
- शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? शिवसेनेचा सवाल
- ”जयंतराव, हा शहाणपणा राजू नवघरे आणि नवाब मलिकांना सांगा”
- द्रविड गुरुजींनी घेतली कर्णधार विराट कोहलीची शाळा : पहा व्हिडीओ