‘बांगड्या’ दाखवून मनसेचा प्रतिकात्मक निषेध करणे हा महिलांचा अपमान नव्हे का?-नितेश राणे

नितेश राणे यांनी साधला कॉंग्रेस आणि संजय निरुपम यांच्यावर निशाना

टीम महाराष्ट्र देशा- ‘बांगड्या’ दाखवून मनसेचा प्रतिकात्मक निषेध केला होता. परंतु, अशाप्रकारे बांगड्या दाखवणे, हा महिलांचा अपमान नव्हे का? काँग्रेस पक्षाच्या मुल्यांचा आणि विचारसरणीचा अपमान नव्हे का? असा सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी कॉंग्रेस आणि संजय निरुपम यांच्यावर निशाना साधला आहे .मनसेने काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली ते कृत्य चुकीचेच होते. मात्र, महात्मा गांधीजींचे अनुयायी असलेले मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते प्रतिहल्ला करण्याच्या धमक्या केव्हापासून द्यायला लागले, असा सवाल नितेश राणे यांनी ट्विटवरून विचारला आहे .

यापूर्वीही मनसेच्या सुशांत माळवदे यांना मारहाण झाल्यानंतर नितेश राणे यांनी संजय निरूपम यांच्यावर आगपाखड केली होती. मराठी माणसाला झालेली मारहाण खपवून घेणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. काँग्रेसला आपली ओळख फक्त उत्तर भारतीयांचा पक्ष अशीच ठेवायची आहे का? काँग्रेसला मराठी माणसांच्या मतांचीही गरज आहे. पण तुर्तास तसे दिसत नाही, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.