वाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!

nitesh rane rupports r j malishka

मुंबई : ‘दुश्मन का दुश्मन दोस्त होता हे’ हे वाक्य सध्या सत्यात उतरताना दिसत आहे. कारण ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’ असं म्हणत मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या आरजे मलिष्काच्या माघे बीएमसी आणि शिवसेना हाथ धुवून माघे लागल्याच दिसत आहे .

मात्र आता मलिष्काच्या पाठीशी काँग्रेस आमदार नितेश राणे उभे राहिले आहेत. नितेश राणे यांनी ट्विट करुन मलिष्काला पाठिंबा दिला आहे. या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात  “मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर.. वाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!”,