नितेश राणेंना मनसे, राष्ट्रवादीचा पाठींबा, १६ जुलैला करणार जेलभरो आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : आमदार नितेश राणेंनी बांधकाम उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घातल्या प्रकरणी अटक करण्यात आली. दरम्यान नितेश राणे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच राज ठाकरे यांच्या मनसेने पाठींबा दिला आहे. राष्ट्रवादी आणि मनसे १६ जुलैला नितेश राणेंच्या अटकेविरोधात जेलभरो आंदोलन करणार असल्याचे समोर आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. दरम्यान या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते.
दरम्यान या प्रकरणी नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ९ जुलै पर्यंत नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज राणे यांना न्यालयात हजार करण्यात येणार आहे. दरम्यान नितेश राणे यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणि मनसे राणे यांना पाठींबा दिला आहे.

इतकेच नव्हे तर राणे यांच्या अटके विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे येत्या १६ जुलैला जेलभरो आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि मनसे यांच्या या निर्णयानंतर सिंधुदुर्गातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.