नारायण राणेंचा नातू आजोबांच्या पक्षात; मात्र नितेश राणे कधी प्रवेश करणार?

nitesh rane with son

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत नवीन पक्षाची घोषणा केली आहे. ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ असे राणेंच्या पक्षाचे नाव असणार आहे. मात्र नारायण राणे यांनी जरी आपला नवीन पक्ष स्थापन केला असला तरी त्यांचे पुत्र कॉंग्रेस आमदार नितेश राणे हे वडिलांच्या पक्षात कधी येणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. नितेश यांच्या प्रवेशावर जरी सध्या प्रश्नचिन्ह असले तरी त्यांच्या मुलाने मात्र आजोबांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

नितेश राणे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करत हि माहिती दिली. ‘माझ्या मुलाने माझ्याआधी त्याच्या आजोबांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. मी अजूनही प्रतीक्षेतच आहे. जय स्वाभिमान” असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान नितेश राणे यांना हे आमदारकीचा राजीनामा कधी देणार असा प्रश्न विचारल असता ‘ जोपर्यंत शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही तोपर्यंत मी आमदारकीचा राजीनामा देणार नाही’ असा उपरोधिक टोला त्यांनी दिला आहे.