उप-अभियंत्यावर चिखल फेकल्या प्रकरणी नितेश राणेंना ९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

टीम महाराष्ट्र देशा : उप-अभियंत्याच्या डोक्यावर चिखलाचे पाणी ओतून केलेले आंदोलन नितेश राणे यांना चांगलेच भोवल्याचे दिसत आहे. उप-अभियंत्यावर चिखल फेकल्या प्रकरणी नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ९ जुलै पर्यत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. दरम्यान या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले.

Loading...

उप-अभियंत्याने या सर्व प्रकारा नंतर पोलिसात धाव घेत नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच कारवाई करत पोलिसांनी नितेश राणे यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे नितेश राणे यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले असता राणेंनी प्रचंडगोंधळ घातल्याचे समोर आले होते.

दरम्यान कणकवली पोलिसांनी नितेश राणे आणि समर्थकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले होते, कोर्टाने नितेश राणे तसेच त्यांच्या समवेत १६ समर्थकांना ९ जुलै पर्यत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी