‘खानच्या मुलाची ठाकरे सरकारला चिंता आहे पण, पाटलाच्या मुलाची?’

‘खानच्या मुलाची ठाकरे सरकारला चिंता आहे पण, पाटलाच्या मुलाची?’

Nitesh Rane and Uddhav Thackeray

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षण आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर नितेश राणे यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मी आवर्जून मराठा समाजाला सांगतो हे दोन वर्ष तुम्ही नजरेसमोर ठेवले पाहिजे. ५८ मोर्चा काढणारे आमच्या मराठा समाजाचे बांधव. यांनी तो काळ परत इथे आणला पाहिजे असं माझं त्यांना आवाहन आहे. या सरकारला जर तुम्ही झुकवलं नाही तर हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत, असं नितेश राणे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.

ठाकरे सरकारला आर्यन खानची किती चिंता आहे ना, पण पाटलांच्या मुलाची चिंता नाही. देशमुखाच्या मुलीची चिंता नाही. पण खानच्या मुलाची चांगली चिंता आहे, असं म्हणत नितेश राणेंनी या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘मराठा समजाने भूमिका घ्यावी, 59 मोर्चे तुम्ही काढले असतील तर 59 वा मोर्चा तुम्ही काढण्याची वेळ आलेली आहे. एवढं आवाहन मी मराठा समाजाचा तरूण, तरूणींना आणि समजाला करतो. आज जर आपण आवाज उचलला नाही. तर आपलं भविष्य निश्चितच अंधारामध्ये येईल’, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या