मुंबई: आपल्याच पक्षातील नेत्यांनी मोठा धक्का देत शिवसेनेला मोठी जखम दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा धक्का पचवणे अत्यंत कठीण गेले. एकनाथ शिंदे यांनी बंडाला सुरुवात केली आणि एकापाठोपाठ अनेक नेत्यांनी सेनेशी पाठ फिरवली. याचा परिणाम म्हणजे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले. “आपल्याच माणसांनी पाठीवर घाव देत पुढची पायरी गाठली”, अशी परिस्थिती सध्या पहावयास मिळाली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हीच परिस्थिती अधोरेखित करणारे ट्वीट केले आहे. यानंतर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
“रिटर्न गिफ्ट”, म्हणत नितेश राणे यांनी एक व्यंगचित्रही पोस्ट केले आहे. ज्यात २०१९ साली देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत शिवसेनेने बाण खुपसल्याचे दाखवण्यात आले आहे तर आता उद्धव ठाकरे यांच्या पाठीत शिंदे यांनी बाण खुपसताना दाखवले. संजय राऊत यांनी आज सकाळीच उद्धव ठाकरेंच्या पाठीत वार झाल्याचे एक व्यंगचित्र पोस्ट केले होते. त्यालाच नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Return gift pic.twitter.com/tXEd9WA0vC
— nitesh rane (@NiteshNRane) June 30, 2022
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काल बहुमत चाचणी संदर्भात दिलेल्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने एकनाथ शिंदे आणि भाजपने राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपचे देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. राजभवन येथे अतिशय छोटेखानी पद्धतीने हा शपथविधी सोहळा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sherlyn Chopra ; “अखेरीस…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शर्लिन चोप्राचे ट्विट चर्चेत
- Devendra Fadnavis and Eknath Shinde : आज महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार शपथ
- Rupali Thombare : “सत्ता येते ,जाते पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…” ; रूपाली ठोंबरे यांच ‘ते’ ट्विट चर्चेत
- Gajanan Kale: “तात्काळ ४०० शासन निर्णय काढणारा” ; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर गजानन काळेंची खोचक टीका
- Rohit Pawar : “अपना भी टाइम आएगा” ; उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर रोहित पवारांची FB POST
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<