Share

Nitesh Rane | भास्कर जाधवांच्या घरावर झालेल्या दगडफेकवर नितेश राणेंनी प्रतिक्रिया, म्हणाले…

Nitesh Rane | मुंबई : शिवसेना पक्षाने काही केलं नाही, असं नारायण राणे म्हणतात, मग तू काय म्हशी भादरत होता का? असा खोचक सवाल शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांना केला होता. यावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून त्यांच्या विरोधात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. अशातच भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नारायण राणेंना मानणारा वर्ग आहे. तुम्ही राजकीय वक्तव्य करायची असतील तर करा. पण खालच्या पातळीवरून बोलणार असाल तर कार्यकर्ते त्या त्या पद्धतीने प्रतिक्रिया देणारच, कुणाकुणाला थांबवणार?, हल्ला नेमका कुणी केला हे शोधून काढणं आता पोलिसांचं काम आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान, काल भास्कर जाधव यांनी भाषण दिलं आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यातून पळून गेला, आम्हासा राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडवायची नाहीये. पण कार्यकर्ते पण बघतायत, भास्कर जाधव यांना या पद्धतीने बोलण्याची सवय असेल तर त्यांनी हे सगळं सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं देखील नितेश राणे म्हणाले.

ही दगडफेक कुणी केली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी त्यांच्या घराभोवती बंदोबस्त वाढवला आहे. तसेच घराशेजारील सीसीटीव्ही कॅमरे तपासले जात आहेत. तसेच शेजाऱ्यांचीही चौकशी करून काही माहिती मिळते का याचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत असलेले भआस्कर जाधव त्यांच्या दौऱ्या शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहेत. तसेच, दगडफेक झाल्यानंतर त्यांनी अद्याप कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या : 

Nitesh Rane | मुंबई : शिवसेना पक्षाने काही केलं नाही, असं नारायण राणे म्हणतात, मग तू काय म्हशी भादरत होता …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now