मी मैदान सोडून पळणार नाही : आमदार नितेश राणे 

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल, तर आमदारांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बरेच आमदार राजीनामे देत आहेत मात्र आमदार नितेश राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट करत मी मैदान सोडून पळणार नाही असं ठणकावून सांगितले आहे. आमदारकी मला समाज आणि महाराष्ट्र पेक्षा मोठी नाही..पण..जिथे कायदे बनतात..त्या विधान सभे मध्ये राहून मी मराठा आरक्षण मिळून देणार.. असं मी मैदान सोडून पळणार नाही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचा राजीनामा

दरम्यान, रिसोडचे काँग्रेस आमदार अमित झनक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. बुधवारी नाशिक बंद यशस्वी झाल्यानंतर गुरुवारी नाशिकमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडे राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या आंदोलनानंतर नाशिकमधील काही सत्ताधारी आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, हे राजीनामे म्हणजे केवळ ढोंग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या राजीनाम्याला काहीही महत्त्व नसून आमदारकीचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे देणे अपेक्षित असून, त्यांनी अध्यक्षांकडे राजीनामे द्यावेत.असा देखावा करणे चुकीचे असल्याचा आरोप माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा

आता पर्यंत कोणी कोणी दिला राजीनामा ?

  • कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सर्वप्रथम आपला राजीनामा सादर केला.
  • वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही आपला राजीनामा दिला आहे.
  • इंदापूरचे आ. दत्तात्रय भरणे यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठविला.
  • मंगळवेढ्याचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
  • मोहोळचे आमदार रमेश कदम हे सध्या तुरुंगात आहेत. मात्र, त्यांनी तुरुंगातूनच आपला राजीनामा दिला.
  • नाशिकमधील देवळा चांदवड मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी देखील राजीनामा दिला आहे.