‘जानकरांना कोकणचे प्रश्न माहीत नाहीत, मत्स्य क्षेत्रातला अभ्यासही कमीचं’

रत्नागिरी : कोकणामध्ये मत्स्य विज्ञान विद्यापीठाची आवश्यकता नाही असे संतापजनक उत्तर विधान परिषदेतील तारांकित प्रश्नाला दिलेल्या मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या वक्तव्याबद्दल सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा कोकणाला सापत्न वागणूक दिली जात आहे, शिरगावचे मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूरला न जोडल्याने हे आकसापोटी होत असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरीकांमधून व्यक्त होत आहेत तर लोकप्रतिनिधीही याबाबत आक्रमक झाले आहेत.

कोकणात मत्स्य विज्ञान विद्यापीठ नाकारून राज्य शासनाने पुन्हा एकदा कोकणावर अन्याय केला आहे. कोकणचा विकास केवळ चार दोन घोषणांनी होणार नाही तर त्यासाठी वेगळ्या अर्थसंकल्पाची आवश्यकता आहे आणि तशी मागणी मी अधिवेशनामध्ये करणार आहे अशी परखड प्रतिक्रिया कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. जानकर हे जरी मत्स्य विकास मंत्री असले तरीही त्यांचा मत्स्य क्षेत्रातला अभ्यास कमी आहे, त्यांना कोकणचे प्रश्न माहीत नाही आणि ते जाणूनही घेतलेले नाही त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य कशात आहे हे त्यांना कधी समजणारच नाही. जानकारांनी कोणताही अभ्यास न करता मत्स्य विद्यापीठाबाबत जे वक्तव्य केले आहे त्याचा मी निषेध करतो असे ते म्हणाले.

Loading...

भाजप सरकारने एकही नवी योजना कोकणात आणली नाही. मत्स्यव्यवसाय विद्यापीठ कोकणात आणावं अशी मागणी गेली पाच वर्ष आम्ही करत आहोत. तरी हे सरकार कोणतीच हालचाल करत नाही. महादेव जानकर म्हणतात की कोकणात विद्यापीठ काढायची गरज नाही. मग कोकणाला न्याय कोणी द्यायचा? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले