बातमी लिक झाल्याने नितेश राणे आणि महादेव जानकर यांची भेट रद्द !

टीम महाराष्ट्र देशा : नितेश राणे आणि महादेव जानकर यांची आजची भेट रद्द, चौथ्या आघाडीबाबत नाही तर सिंधुदुर्गात उमेदवारांसाठी ही भेट होणार होती, मात्र भेटीची बातमी लिक करुन चुकीचा मेसेज गेल्याने नितेश राणेंकडून भेट रद्द करण्यात आली आहे.

रत्नागिरी- सिंधुदुर्गात रासपाचा पाठिंबा स्वाभिमान पक्षाला मिळावा यासाठी जानकर भेटणार असल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान, भेटीच्या कारणाची चुकीची बातमी पसरल्यामुळे नितेश राणे यांनी आजची ही भेट रद्द केल्याचं समजतं आहे. आज सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास जानकर आणि राणे यांच्यामध्ये ही भेट घडणार होती.

‘भाजपकडून जगावटपात योग्य सन्मान मिळत नसल्याची भावना असल्याने छोट्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपवर दबाव वाढवण्यासाठी छोट्या मित्र पक्षांची मोठ बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ही नितेश राणे जानकरांची भेट घेणार’ असल्याच बोलल जात होत.