Nitesh Rane | मुंबई : कोल्हापूरमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणानंतर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांने आक्रमक झाले असल्याचं दिसून येतं आहे. नितेश राणे यांनी लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) काढला होता. तसेच, कोल्हापूरमध्ये 17 ऑक्टोबरपासून बेपत्ता असणारी अल्पवयीन मुलगी सापडली आहे. कोल्हापूर पोलिसांनी मुलीसह तिला आपल्या जाळ्यात ओढून नेणाऱ्या मुलालाही शोधलं आहे. दोघांना कर्नाटकातील संकेश्वरमधून ताब्यात घेण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले नितेश राणे (Nitesh Rane)
कोल्हापूरमधील तरुणी 18 दिवसांपासून गायब होती. आम्ही जन आंदोलन केल्यानंतर ती तरुणी काही तासात घरी कशी येते?, असा सवाल याठिकाणी नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी पैसे दिले जातात, बाईक दिली जाते. धर्मपरिवर्तनाला बळ देण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. रेट कार्ड करण्यात आलं आहे. शीख तरुणीला फसवलं तर सात लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर सहा लाख, गुजराती ब्राह्मण तरुणीसाठी सहा लाख, ब्राह्मण तरुणीसाठी पाच लाख, क्षत्रिय तरुणीसाठी चार लाख असं रेट कार्ड आहे. तरुणींना विकण्यापर्यंत यांची मजल जात आहे. धर्म परिवर्तनाच्या नावाखाली मुलींचं आयुष्य बर्बाद केलं जात असल्याचं राणेंनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी, राज्यात हिंदुत्ववादी सरकार आलं असून हिंदू समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीने टार्गेट केलं तर आम्ही सोडणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. येणाऱ्या अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचा अभ्यास सुरू असून लवकरच कायदा येईल आणि अशा घटना थांबतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | महाराष्ट्रातून प्रकल्प का गेले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण, म्हणाले…
- Narendra Modi | पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर
- MNS | सामनाच्या ‘त्या’ जाहीरातीवर मनसेचा सवाल, म्हणाले…
- Himesh Reshammiya | ‘Badass रविकुमार’ चित्रपटाचा टीजर रिलीज, हिमेश रेशमियाचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन
- Uddhav Thackeray | “उद्धव ठाकरे शिवसेना वाचवण्यासाठी पंढरीच्या वारी ऐवजी हैद्राबादची वारी करतील”