लहान मुलांचे बोलणे मनावर घेऊ नये ; संजय निरुपमांचा नितेश राणेंना टोला.

नितेश राणे

वेब टीम- नितेश राणे सध्या कोणत्या पक्षात आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. तसेही लहान मुलांच्या बोलण्यावर मी उगाच कशाला काय बोलावे,असा टोला संजय निरूपम यांनी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनाही टोला लगावला

फेरीवाल्यांना भडकावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपा आणि मनसेवर आरोपांच्या फैरी झाडल्या. हप्तेबाजी सुरू राहावी, यासाठी फेरीवाल्यांना नियमित केले जात नाही. मनसेचेही काही नेते फेरीवाल्यांकडून हप्ता घेतात, असा आरोप निरूपम यांनी केला. या फेरीवाल्यांकडून अनेक पक्षातील नेते हप्ता घेतात. मनेसेचेही काही नेते हप्ता घेतात. त्यांची नावे मी लवकरच सांगणार आहे, असेही ते म्हणाले.